अंगलू हिंसाचार प्रकरणी दिलासा
वृत्तसंस्था/ हैदराबाद
आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना शुक्रवार, 13 ऑक्टोबर रोजी आंध्र उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. अंगलू हिंसाचार प्रकरणी न्यायालयाने नायडूंना दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने गुऊवारी 12 ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता. अंगलू हिंसाचार प्रकरण हे तेलगू देसम पक्षाच्या (टीडीपी) यावषी ऑगस्टमध्ये झालेल्या रॅलीशी संबंधित आहे. रॅलीदरम्यानच दगडफेक झाल्याने अनेक पोलीस, टीडीपी आणि सत्ताधारी वायएसआरसीपी समर्थक जखमी झाले होते. त्यानंतर विविध ठिकाणी दंगली उसळल्या होत्या. कौशल्य विकास महामंडळाच्या 300 कोटी ऊपयांच्या घोटाळ्याप्रकरणी नायडू सध्या राजमहेंद्रवरम मध्यवर्ती कारागृहात आहेत. कोट्यावधी ऊपयांच्या कथित कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी ते अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत. 9 सप्टेंबर रोजी सीआयडीने त्यांना 371 कोटी ऊपयांच्या कौशल्य विकास घोटाळ्यात अटक केली होती.









