Chandoli Dam : वारणा नदीपात्राचा मुख्य जलसाठा असलेल्या वसंत-सागर या चांदोली धरणातून विसर्गाला सुरवात झाली आहे. आज (दि. ८) ऑगष्ट रोजी दुपार पासून नदीपात्रात २ ते ४ हजार क्यूसेसने विसर्गास प्रारंभ करण्यात आला असून, वारणा नदीकाठच्या गावांना व ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती वारणा पाटबंधारे उप विभाग कोडोलीचे सहा. अभियंता मिलींद किटवाडकर यानी दिली.
चांदोली धरण ३४.४० टीएमसी क्षमतेचे आहे. सध्या धरणात पाणीसाठा २८.७८ टीएमसी झाला असून, धरण ८३.६५ टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात १४५२ मि.मी. पाऊस पडला आहे. धरण क्षेत्रात पाऊसाचे सातत्य असल्याने व अतिवृष्टी वाढत असल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रीत रहाण्यासाठी नदी पात्रात विसर्ग सुरू केल्याचे मिलींद किटवाडकर यानी सांगीतले.
Previous Articleसातुळी बावळाट तिठा येथे पावणे दोन लाखाची दारू जप्त
Next Article आचरा भंडारवाडीत घराच्या पडवीवर माड कोसळून नुकसान









