कोकरूड वार्ताहर
शिराळा पश्चिम भागातील चरण, आरळा, मणदूर व चांदोली धरण पारिसरात पावसाची रिपरिप सुरूच असून ओढे,नाले भरून वाहत आहेत. परिणामी वारणा नदी तुडूंब भरून वाहत आहे. गेल्या तीन दिवसांत पडत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा 15.65 टीएमसी झाला असून धरण 45.50 टक्के भरले आहे.
चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर हळूहळू वाढतच आहे.त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातुन येणाऱ्या पाण्याची आवक वाढू लागल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत हळूहळू वाढ होत आहे. सध्या धरणात 15.65 टीएमसी पाणीसाठा म्हणजे धरण 45.50 टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात आज सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत 24 तासात 22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण 392 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
परीसरात पडलेल्या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी भात शेतांमध्ये पाणी साचुन राहीले आहे. दमदार पाऊसाच्या एन्ट्रीने परिसरात भात लावणीच्या कामाला गती मिळणार मिळाली.