शिराळा : चांदोली परिसरात मंगळवारी भूकंपाचा सौम्य धक्का बसला असल्याची माहिती पाटबंधारे वारणा विभागाचे विभाग प्रमुख गोरख पाटील यांनी दिली.
गोरख पाटील म्हणाले, या भूकंपाची तीव्रता सौम्य असल्याने परिसरात भूकंप जाणवला नाही. मात्र त्याची नोंद भूकंप मापण केंद्रावर असणाऱ्या यंत्रात झाली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावती भूमापन केंद्रापासून 15.2 किलोमीटर अंतरावर होता. मंगळवारी सात वाजून सहा मिनिटे व 22 सेकंदांनी हा धक्का जाणवला. भूकंपाची रजिस्टर स्केलवर तीव्रता तीन एवढी सौम्य असून परिसरात 22 सेकंद हा भूकंप झाला आहे. धक्क्याची तीव्रता सौम्य असल्यामुळे परिसरात कोणतीही वित्त अथवा जीवित हानी झालेली नाही.
हे ही वाचा : कोल्हापूरच्या जवानाच्या कुटुंबाला माजलगावकडून ४ लाख ५२ हजाराची मदत