चंदगड रुग्णालयात 100 खाटांची मंजुरी होणार
चंदगड : चंदगड तालुक्यातील रूग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी चंदगड ग्रामीण रुग्णालयात १०० खाट मंजूरीसाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि चंदगड आरोग्य विभागाने प्रस्ताव पाठवण्याचा आदेश आरोग्य सेवा महाराष्ट्र राज्य सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईता यांनी दिला आहे.
चंदगड येथील ग्रामीण रूग्णालयात रूग्ण संख्येच्या तुलनेत अत्यल्प खाटा असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. त्या ठिकाणी खाटांची संख्या वाढवून शंभर करावी, अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी आरोग्य उपसंचालक कोल्हापूर, जिल्हा शल्य चिकित्स व राज्य आरोग्य सेवा सहसंचालकांकडे केली होती.
त्यानुसार आयुक्तालयाने चंदगड येथील ग्रामीण रुग्णालय १०० खाटा करणेबाबतचा प्रस्ताव सादर करण्याबाबत आदेश दिले आहेत.








