नवी दिल्ली
चंदीगड महापालिकेच्या महत्त्वाच्या पदांची निवडणूक पारदर्शक पद्धतीने करविण्यासाठी महापौर कुलदीप कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने कुलदीप कुमार यांच्या याचिकेवर प्रशासनाला नोटीस जारी केली आहे. 27 जानेवारी रोजी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. महापालिकेचा महापौर, वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक गुप्त मतदानाऐजी नगरसेवकांचे हात उंचावून करविण्यात यावी अशी मागणी कुलदीप कुमार यांनी याचिकेद्वारे केली आहे.









