वार्ताहर,कोवाड
चंदगड आगराची कोवाड, कामेवाडी ही बस अचानक रद्द झाल्याने शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दुपारच्या रणरणत्या उन्हात चालत घरी जावे लागले. यामुळे विद्यार्थ्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोवाड येथील श्रीराम माध्यमिक व श्रीमान व्ही. पी.देसाई ज्युनिअर कॉलेज आणि सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कला,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात कामेवाडी भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात.चंदगड आगाराची चंदगड-कामेवाडी ही बस कोवाड येथे सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास येवून ती कामेवाडीला निघते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी वेळेत जाण्यासाठी चांगली सोय आहे.
शुक्रवार (दि. 31) रोजी चंदगड आगाराच्या या बसवर भरवसा ठेवून आलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेज करून घरी परतत असताना गाडीची वाट पाहून थकल्यानंतर ती येणार नसल्याचे समजले. त्यामुळे मार्च महिन्यातल्या रणरणत्या उन्हात उपाशीपोटी चिंचणे,कामेवाडी,नरगटे,यर्तेनहट्टी गावांतील विद्यार्थ्यांना चालत घरी जावे लागले.या कामेवाडी परिसरातील ग्रामस्थ ही कोवाड येथे बाजारानिमित्त आणि दवाखान्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात.या प्रवासीवर्गालाही अचानक गाडी रद्द झाल्याने मोठा फटका बसला.
एकीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी शासन वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत असताना दुसरीकडे अचानक गाड्या रद्द करून शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य जनतेचा खेळ खंडोबा करणाऱ्या चंदगड आगाराबद्दल जनमाणसातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









