मडगाव : स्व. भाऊसाहेब बांदोडकरानी गोमंतकीय संस्कृती समृद्धीसाठी गोव्यात कला अकादमी संस्कृती विभाग स्थापन करून देश परदेशात गोव्याची संस्कृती दर्शन होण्यास प्रारंभ केला. त्याच प्रमाणे हिच प्रेरणा घेऊन त्याच्या नाव्याने स्थापन झालेल्या दयानंद कला केंद्राने आपला गांव, आपला गोवा, आपला देश ही संकल्पना पुढे आणून त्यांच्या पुण्यतिथी वर्षा निमित्त गोवा चंदेरी महोत्सव महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोल्हापूर शहरात केला. गोवा व कुडचड्याची परंपरा , येथिल पर्यटन वारसा ,स्थळाच्या परंपराना उजाळा देणार असा चंदेरी महोत्सव आयोजन केला व कुडचड्याचा व गोव्याच्या सांस्कृतिक इतिहासात नोंद केल्याबद्दल केंद्राचे सदस्य मित्र वकिल संघटनेचे सदस्य पुर्व सचिव अँड. वल्लभ कुडचडकर, केंद्राचे पुर्व संगीत विद्यार्थी अँड .विश्वास नाईक, अँड वल्लभ देसाई यांनी अभिनंदनपर संदेश पाठवून दयानंद कला केंद्र अध्यक्ष मोर्तू नाईक सचिव बंटी उडेलकर यांना शुभेच्छा दिल्या त्याच बरोबर गोवा शासन विशेषकऊन कला व संस्कृती खाते , पर्यटन खाते, माहिती खाते यांना ह्या महोत्सवाला शासकीय आश्रय पुरविण्याचे आवहनही करण्यात आले. अँड. कुडचडकर यांनी केंद्राच्या भवनासाठी सरकारने कुडचड्यात एक जागा उपलब्ध करून द्यावी, अँड. गावस देसाई, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक पुर्व सदस्य यांनी चंदेरी महोत्सवास उदयपूरच्या केंद्राची मदत मिळण्याची इच्छा वर्तवली, तर अँड. नाईक यांनी सरकारने चंदेरी महोत्सव राज्य उत्सव म्हणून जाहिर करावा अशी मागणी यावेळी केली. कोल्हापूर येथील महोत्सव यशस्वी करून दयानंद केंद्र पथक समिती नुकतीच गोव्यात परतले.
Previous Articleसांखळी नगराध्यक्षपदासाठी संगीत खुर्चीची रंगीत तालीम ?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









