आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या धाडाडीमुळे विकासकामे पूर्णत्वास : सरपंच तुळशीदास गावस
पेडणे : पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडे काम करण्याची धडाडी असून पेडणे मतदार संघातील जनतेने खंबीरपणे उभी राहून त्यांना साथ द्यावी असे आवाहन चांदेल- हसापूरचे सरपंच तुळशीदास गावस यांनी चांदेल येथे केले. बैलपार येथे उभारण्यात येणाऱ्या पाणी प्रकल्पाच्या कामासाठी चांदेल ते बैलपार येथील रस्त्याचे खोदकाम करून जलवाहिनी टाकण्यात आली होती त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्याची नादुऊस्ती होऊन मोठ्या प्रमाणात या भागातील नागरिकांना आणि वाहन चालकाना त्रास होत होता. या समस्येवर तोडगा काढण्याची नागरिकांनी तसेच पंचायत मंडळाने वेळोवेळी मागणी केली होती. पेडणे मतदारसंघाचे आमदारांनी या कामी विशेष लक्ष घालून तातडीने हे काम संबंधित खात्याकडून हाती घेतले आणि रस्ता दुऊस्तीचे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे हे काम आज होत आहे, असेही गावस म्हणाले सुऊवातीला आमदार प्रवीण आर्लेकर यांनी श्रीफळ वाढवून रस्ता दुऊस्ती आणि हॉटमिक्स कामाच्या शुभारंभ केला. यासाठी पावणेदोन कोटी रु. खर्च येणार आहे. यावेळी सरपंच तुळशीदास गावस,उपसरपं उपसरपंच ऊचिरा मळीक, पंच बाळा शेटकर , पंच प्रजय मळीक अभियंते शिवनाथ गावस, कंत्राटदार सुरेश माशेलकर, समीर माशेलकर, महेश परब आदी यावेळी उपस्थित होते.
पेडणे मतदारसंघातील पाण्याची समस्या सुटणार : आमादार प्रवीण आर्लेकर
पेडणे तालुक्मयात मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या आहे .ही समस्या आता लवकरच सुटणार असून बैलपार येथील पाणी प्रकल्पामुळे तसेच चांदेल येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या 15 एम. एल. डी या नवीन पाणी प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असून त्याचे उद्घाटन पुढील काही दिवसांत होणार आहे. येणाऱ्या काळात पेडणे मतदारसंघाचा विकास अशाच पद्धतीने केला जाईल. यासाठी जनतेने विकास कामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले. पंच सदस्य प्रजय मळीक यांनीही आमदारांच्या कामाची प्रशंसा केली.









