सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
Chance of rain with thunder in Sindhudurga on 7th and 8th
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक ०६ एप्रिल २०२३ रोजी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली असून दिनांक ०७ व ०८ एप्रिल २०२३ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व ३० ते ४० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक दक्षता घेण्यात यावी.असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने केली आहे.









