प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात पुढील 2 दिवसात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आह़े मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस गणपती आगमनाच्यावेळी सक्रिय होणार आह़े गणपतीच्या आगमनासोबतच वरुणराजाचे देखील आगमन होणार असल्याने बळीराजाच्या आनंदात भर पडणार आह़े
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जोरदार पडणाऱया पावसाचा जोर 15 ऑगस्टनंतर कमी झाल़ा शुक्रवारी जिह्यात केवळ 6.44 मि.मी. इतक्या सरासरीची नोंद करण्यात आली होत़ी तर शनिवारी 3.07 मि.मी. पावसाची नोंद झाल़ी तर शनिवारी जिह्यात तालुकानिहाय मंडणगड 1.70 मि.मी., दापोली 1 मि.मी., खेड 1.10, गुहागर 2.40, चिपळूण 4.20, संगमेश्वर 6.40, रत्नागिरी 1.40, लांजा 2.70, राजापूर 6.70 इतकी नोंद करण्यात आल़ी
जिह्यातील बहुतांश तालुके हे मागील काही दिवसांपासून कोरडेच आहेत़ भातशेती वाढीच्या भरात असताना पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला होत़ा दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान खात्याने 30 ऑगस्टपासून जिह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आह़े याचा फायदा भातशेतीबरोबरच जिह्यातील अन्य पिकांनाही होणार आह़े
खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या
जिह्यात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आह़े हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवल्याने खरेदीसाठी बाजारपेठा पुलून गेल्या आहेत़ तसेच चाकरमानीही जिह्यात दाखल होण्यास सुरूवात झाली आह़े पावसाची शक्यता लक्षात घेऊन गणेशोत्सवाची तयारी करण्यात गणेशभक्त दंग झाले आहेत़









