वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर न्यूझीलंडचा संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा 15 सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. अष्टपैलू रचिन रवींद्रला या मालिकेसाठी निवड समितीने संधी दिली आहे. पहिली कसोटी 28 नोव्हेंबरपासून सुरू होईल.
न्यूझीलंड संघ- टीम साऊदी (कर्णधार), ब्लंडेल, कॉनवे, हेन्री, जेमीसन, लॅथम, मिचेल, निकोल्स, एझाज पटेल, फिलिप्स, रचिन रवींद्र, सँटनर, सोधी, विलियमसन आणि यंग.









