रोहित ढवळे सामनावीर : एसडीएमला उपविजेतेपद
बेळगाव : जीआयटी तांत्रिक महाविद्यालय आयोजित व्हीटीयु बेळगाव विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात व्हीटीयू बेळगावने एसडीएम धारवाडचा 74 धावांनी पराभव करून व्हीटीयु चषक पटकाविला. रोहित ढवळेला सामनावीराने गौरविण्यात आले, जीआयटी मैदानावर आयोजित केलेल्या अंतिम सामन्यात व्हीटीयूने प्रथम फलंदाजी करताना 25.5 षटकात सर्व गडी बाद 162 धावा केल्या. त्यात विनीत पाटीलने 8 चौकारांसह 45, तबरक मोमीनने 2 षटकार व 5 चौकारांसह 40, रोहित ढवळेने 2 चौकारांसह 15 धावा केल्या. एसडीएम धारवाडतर्फे मंजुनाथ जी. ने 21 धावात 2, दर्शन बलगलीने 23 धावात 2, चिन्मय कुलकर्णीने 27 धावात 2, कृष्णा लमानीके 34 धावात 2 तर नंदेश बलगलीने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसडीएम धारवाडचा डाव 21.2 षटकात 88 धावात आटोपला.
त्यात चिन्मय कुलकर्णीने 5 चौकारांसह 23, अभिनवराज व कृष्णा लमानी यांनी प्रत्येकी 14 धावा केल्या. व्हीटीयुतर्फे रोहित ढवळेने 16 धावांत 4, कल्पेश संभोजीने 34 धावात 4 तर तबरक मोमीन व प्रशांत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे प्रा. एस. पी. देशपांडे, प्रा. ईश्वरगौडा, प्रा. शिंदे. प्रा आय. व्ही. पाटील, केशव गुडी यांच्या हस्ते विजेत्या व्हीटीयु बेळगाव, उपविजेत्या एसडीएम धारवाड संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून तेजस पवार, सोमनाथ सोमण्णाचे, ईश्वर ईटगी, आनंद कुंभार, यश कळसाण्णावर, हनमंत यादव व केतज कोल्हापुरे तर स्कोरर म्हणून प्रमोद जपे, रवी कणबरगी यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शुभस्वा शिखरे, आकाश मंडोळकर, ओझस रेवणकर, गिरीश कडोलस्कर, यल्लाप्पा कांबळे, विख्यात कट्टी, श्रेयस अमनगी यांनी विशेष परिश्रम घेतले.









