जेएमएमविरोधात उठवला आवाज : पक्षाने अपमान केल्याचा दावा : पुढील वाटचालीसाठी दिल्लीत दाखल
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी झामुमो सोडण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी सोशल मीडिया साइट ‘एक्स’वर आपल्या भावना व्यक्त करत झारखंड मुक्ती मोर्चाविरोधात आवाज बुलंद केला आहे. पक्षामध्ये माझा अपमान झाला आहे. मी मुख्यमंत्री असताना चांगले काम करत होतो. मला पदावरून काढण्यात आले. मी सक्रीय असतानाही मला सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले, असे आरोप करत त्यांनी बंडखोरी करण्याचे स्पष्ट संकेत रविवारी दिले. त्यांनी आपल्या सोशल मीडिया साईटवरील ‘झामुमो’ हा उल्लेखही हटवला आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेदरम्यान नाराजीचे कारण उघड केले आहे. ‘आजची बातमी पाहिल्यानंतर तुम्हा सर्वांच्या मनात अनेक प्रŽ निर्माण होत असतील. मी नेहमीच लोकहिताचे राजकारण केले आहे. राज्यातील आदिवासी, आदिवासी, गरीब, मजूर, विद्यार्थी आणि मागासवर्गीय लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. मात्र, तरीही वारंवार होणाऱ्या अपमानित वृत्तीमुळे आपण हैराण झालो आहे’ अशा भावना चंपाई सोरेन यांनी व्यक्त केल्या आहेत.
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या काही महिन्यांपूर्वी राज्यात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्मयता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेणार आहेत. चंपाई सोरेन रविवारी दिल्लीत पोहोचले असून त्यांच्या पाठीशी अन्य काही आमदारही आहेत.
भाजपमध्ये प्रवेश करण्याची अटकळ
गेल्या दोन दिवसांपासून झारखंडमध्ये अचानक राजकीय गोंधळ वाढला. आता चंपाई सोरेन झामुमोच्या काही आमदारांसह भाजपमध्ये दाखल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या ते दिल्लीत दाखल झाले असून भाजपच्या सर्वोच्च नेतृत्त्वाची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. ते लवकरच दिल्लीत अमित शाह आणि जे. पी. ननड्डा यांची भेट घेऊ शकतात.
निवडणुकीपूर्वी हेमंत सोरेनना धक्का देणार
झारखंडमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. याचदरम्यान माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन झारखंड मुक्ती मोर्चाला (जेएमएम) मोठा धक्का देऊ शकतात, अशी शक्मयता वर्तवली जात आहे. आता त्यांच्या उत्तरानंतर झारखंडचे राजकारण पुन्हा तापले आहे. तुऊंगातून परत आल्यानंतर हेमंत सोरेन यांनी पुन्हा एकदा झारखंडची धुरा आपल्या हातात घेतली. मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यापासून चंपाई सोरेन नाराज असल्याचे वारंवार दिसून येत होते.
कोण आहे चंपाई सोरेन?
चंपाई सोरेन यांनी गेल्या महिन्यात जुलैमध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आणि हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री झाले. चंपाई सोरेन 2 फेब्रुवारी 2024 ते 3 जुलै 2024 पर्यंत झारखंडच्या मुख्यमंत्री होते. ते सातवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2005 पासून ते सतत सेराईकेला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 1991 मध्ये ते सराईकेला मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. हेमंत सोरेन यांनी 2019 मध्ये चंपाई सोरेन यांना पॅबिनेट मंत्री केले. त्यांच्याकडे वाहतूक, अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याणाची जबाबदारी देण्यात आली होती.









