संजय होसमठ यांची पत्रकार परिषदेत हाक
बेळगाव : देशात क्रेडिट सोसायटी (पतसंस्थांना) अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून यावर तोडगा काढला जाणार आहे. यासाठी येत्या 2 आणि 3 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे क्रेडिट सोसायटींची राष्ट्रीय परिषद बोलविण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय संयोजक डॉ. संजय होसमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली. कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था महामंडळ आणि कर्नाटक राज्य सौहार्द यांच्या नेतृत्वाखाली चलो दिल्लीची हाक देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. यासह विविध क्रेडिट सोसायटींचे 10 हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. क्रेडिट सोसायटींच्या समस्या सोडविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ठेवी, नोंदणी, डिजिटलचा वापर, नवीन प्रणाली, कार्यक्षम कर्ज वसुली यासह इतर विषयांवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे. दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या मैदानावर ही परिषद भरविण्यात येणार आहे. क्रेडिट सोसायटींच्या प्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही केले आहे. यावेळी तम्मन्ना कच्चर•ाr, जगदीश कवटगीमठ, सुधाकर महिंद्रकर आदी उपस्थित होते.









