वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2025 च्या फेब्रुवारी महिन्यात एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धांपैकी 4 स्पर्धांचे यजमानपद भारताला भूषविण्याची संधी मिळाली आहे. त्यानुसार एटीपी 100 पहिली स्पर्धा चेन्नईत होणार आहे. सदर माहिती अखिल भारतीय टेनिस संघटनेतर्फे सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
एटीपीच्या चॅलेंजर स्पर्धांचे ठिकाण आणि तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 3 फेब्रुवारीपासून चेन्नईत एटीपी 100 स्पर्धेला प्रारंभ होईल. त्यानंतर एटीपी चॅलेंजर दुसरी स्पर्धा 10 फेब्dरुवारीपासून बेंगळूरमध्ये, तिसरी स्पर्धा पुणे येथे 17 फेब्रुवारीपासून तर चौथी स्पर्धा नवी दिल्लीत 24 फेब्रुवारीपासून सुरु होईल. 2024 च्या टेनिस हंगामात भारताने तीन चॅलेंजर टेनिस स्पर्धांचे यजमानपद भूषविले आहे.









