वृत्तसंस्था/ दुबई
येथे सुरु असलेल्या आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांचे एकेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले.
शुक्रवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कोरीयाच्या द्वितीय मानांकित अॅन सी यंगने भारताच्या दोनवेळा ऑलिंपिक पदक मिळविणाऱ्या पी. व्ही. सिंधूचा 18-21, 21-5, 21-9 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या लढतीत आठव्या मानांकित सिंधूने पहिला गेम जिंकला पण त्यानंतर पुढील दोन गेम्समध्ये तिचा खेळ दर्जेदार न झाल्याने तिला पराभूत व्हावे लागले. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या एच. एस. प्रणॉय याने दुखापतीमुळे माघार घेतल्याने जपानच्या कांता सुनेयामाने उपांत्यफेरी गाठली आहे. या लढतीत सुनेयामाने पहिला गेम 21-11 असा जिंकला होता. तर दुसऱ्या गेममध्ये तो 13-9 असा आघाडीवर होता. या स्पर्धेत भारताच्या रोहन कपूर आणि एन. सिक्कि रे•ाr यांचे मिश्र दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. इंडोनेशियाच्या डिजेन फर्दिनानसिया आणि ग्लोरिया विडेजा यांनी रोहन कपूर आणि एन सिक्कि रे•ाr यांचा 21-18, 19-21, 21-15 असा पराभव करत उपांत्यफेरीत स्थान मिळविले. हा सामना 70 मिनिटे चालला होता.









