श्री जोतिबा मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम-गुरुवारी महाप्रसाद : मंदिरासमोर उद्यानही साकारणार
प्रतिनिधी / बेळगाव
शिवबसवनगर येथील श्री जोतिबा मंदिरमध्ये चैत्र यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे. शनिवार दि. 16 रोजी पहाटे 6 वा. श्री जोतिबा मूर्तीला अभिषेक घालण्यात येणार आहे. रात्री 8 वाजता महाआरती होणार आहे. तरी भक्तांनी मोठय़ा संख्येने धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गुरुवार दि. 21 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत महाप्रसाद होणार आहे. या महाप्रसादासाठी अनेक भक्तांनी सढळ हस्ते मदत केली आहे. तरी ज्यांना मदत करायची आहे त्यांनी जोतिबा मंदिर कमिटीशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. दरम्यान, जोतिबा मंदिराची उभारणी भक्तांच्या देणगीतून करण्यात आली आहे. अजूनही मंदिराचे बरेच काम बाकी आहे. मंदिरासमोर उद्यानासाठी मदतीची गरज आहे. तेव्हा ज्या भक्तांना महाप्रसाद तसेच मंदिराला मदत करायची आहे, त्यांनी 9480398088 आणि 9902392077 यावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.









