बेळगाव : हुबळी येथे चैतन्य स्पोर्ट्स फौंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 10 वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत मानस स्पोर्ट्स फुटबॉल संघाने धारवाड सिटी एफसी संघाचा 2-0 असा पराभव करुन चैतन्य चषक पटकाविला. आर्कान बडेघरला उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला. एमएसडीएफ संघाने पहिल्या सामन्यात स्पोर्टिंग हुबळी फुटबॉल अकादमी संघावर 3-0 असा विजय मिळविला. आर्कान बडेघरने 2, आदित्य नाकाडीने 1 गोल नोंदविला. उपांत्य फेरीत एमएसडीएफ संघाने चैतन्य स्पोर्ट्स फौंडेशन हुबळी संघावर 7-0 असा विजय प्राप्त केला. आराध्य नाकाडी 4, हुसेन जमादार 2 व आर्कान बडेघरने 1 गोल नोंदविला.
अंतिम सामन्यात एमएसडीएफ संघाने धारवाड सिटी एफसी संघाचा 2-0 असा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. हुसेन जमादार, जैन मुल्ला यांनी एकेक गोल नोंदवला. त्यांना फुटबॉल प्रशिक्षक मानस नायक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









