विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव : गुणवंत विद्यार्थी, शाळा, शिक्षक आणि भाजप कार्यकर्त्यांचा सत्कार
प्रतिनिधी /काणकोण
काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांचा वाढदिवस बुधवारी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रात रूबी रेसिडेन्सीमधील कार्यक्रमात काणकोण मतदारसंघातील असंख्य मतदार, हितचिंतक आणि भाजप कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा त्यांनी स्वीकारल्या. त्यानंतर बलराम शिक्षणसंस्थेच्या मोखर्ड येथील बलराम डे केअर स्कूल, अर्धफोंड येथील बलराम उच्च माध्यमिक विद्यालय, आमोणे येथील बलराम निवासी शाळा त्याचप्रमाणे अन्य प्राथमिक शाळा आणि शिशुवाटिकेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.
पैंगीणच्या श्रद्धानंद विद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच माजी शिक्षक असलेल्या सभापती तवडकर यांचा संस्थेचे ज्येष्ठ सदस्य उमेश प्रभुदेसाई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या समारंभाच्या व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अरुण भट, सचिव सुनील पैंगणकर, मुख्याध्यापिका सीमा प्रभुगावकर, चिन्मय आमशेकर उपस्थित होते. श्रद्धानंदने आपल्या आयुष्याला कलाटणी दिली, असे सांगताना तवडकर यांनी, ज्या शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले, शिकविले त्या सर्व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आजचे पालक तसेच विद्यार्थी देखील सुदैवी आहेत. आपण मात्र 5 वी ते 7 वीपर्यंत आमोणे ते पैंगीण असे 9 किलोमीटर अंतर पायी तुडवत होतो, असे सांगून त्यांनी आपला गौरव केल्याबद्दल संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
देळे-काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयातर्फेही तवडकर यांचा गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष चेतन देसाई, पदाधिकारी राजेंद्र देसाई, मंजू गावकर, प्राचार्य डॉ. मनोज कामत यावेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे लोलयेच्या श्री दामोदर विद्याप्रसारकतर्फे तवडकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विश्वजित वारीक, नारायण प्रभुगावकर, निवृत्त मुख्याध्यापक अरुण भट, आर. एस. नाईक, पिंगे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थी, शाळांचा गौरव
संध्याकाळी श्रीस्थळ येथील जीएम सेलिब्रेशन सभागृहात आयोजित कार्यक्रमात दहावीच्या परीक्षत यश संपादन केलेल्या प्रणय गावकर, सानिया गावकर, श्रीजा नाईक, सेनवा बार्रेटो, प्रतीक काणकोणकर, आविष्का पैंगीणकर, रिना गावकर, गौरवी कुडचडकर, कोमल दैकर, शिवानी वेळीप, ईशा देर्सो, प्रगती नाईक, संस्कृती मडगावकर, नेस्ली फर्नांडिस, दहावीत तालुक्यात पहिल्या तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या भूमी गोसावी, पूर्वी नाईक आणि शायना मिराशी त्याचप्रमाणे बारावीच्या परीक्षेत विविध विभागांतून प्रथम आलेल्या दिपाली गावकर, दीक्षा वेळीप, नेहा दैकर, ब्लेझ बोर्जिस, उमन ना. देसाई, कैलाश वेळीप, अनिता पै, स्नेहा भंडारी, भार्गवी वारीक, अंकिता गावकर, रेनिता बार्रेटो, नियामी बार्रेटो यांच्यासह ज्या शाळांनी दहावी परीक्षेत 100 टक्के निकाल दिला त्या सर्व शाळांचा गौरव करण्यात आला.
10 शिक्षकांचा सत्कार
यावेळी काणकोण तालुक्यातील विविध शाळांतील 10 शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यात गणपत नाईक, स. मा. विद्यालय खोतीगाव, सीमा प्रभुगावकर श्रद्धानंद विद्यालय, उर्वी फळदेसाई, श्री निराकार विद्यालय (सर्व मुख्याध्यापक), नारायण देसाई, सेंट तेरेझा हायस्कूल, श्रद्धा देसाई, श्री दामोदर विद्यालय, नीलेश गावकर, श्री निराकार विद्यालय, संज्योत नाईक, श्री कात्यायणी बाणेश्वर विद्यालय, नंदकुमार कामत, स. प्रा. वि. पर्तगाळी आणि दीपा देसाई, श्री मल्लिकार्जुन विद्यालय (सर्व शिक्षक) यांचा त्यात समावेश राहिला.
भाजप कार्यकर्त्यांचा सत्कार
काणकोण मतदारसंघातील 14 भाजप कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यात लक्ष्मीकांत वारीक, दिनेश नाईक, गोपी गावकर, श्रीरंग गावकर, खुशाली पागी, आनंद देसाई. किरण गावकर, विल्मा कुतिन्हो, प्रवासी गावकर, सुनीता उदय गावकर, अंजली आनंद वेळीप, सारिका नाईक, अंकुश पोळेकर, आरती काणकोणकर यांचा श्रीफळ, शाल आणि मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शिक्षक आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. समारंभाच्या व्यासपीठावर सावर्डेचे आमदार गणेश गावकर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मयेचे आमदार पेमेंद्र शेट, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, भाजपाचे संघटनमंत्री सतीश धोंड, सर्वानंद भगत, काणकोणचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो, अन्य नगरसेवक, अशोक काळे, चंदा देसाई यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री सावंत यांनी सभापती तवडकर यांच्या विविध पैलूंबद्दल मते मांडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर तवडकर यांनी आपल्या भाषणात काणकोण मतदारसंघातील मतदारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. रेशा खोलकर यांनी गायिलेल्या ईशस्तवनानंतर काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्रसाद पागी आणि रेशा खोलकर यांनी केले. आमदार गणेश गावकर, ऍड. नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष रिबेलो, नगरसेवक रमाकांत ना. गावकर, आमदार कृष्णा साळकर आणि अन्य मान्यवरांनी याप्रसंगी तवडकर यांच्या कार्यावर भाष्य केले.









