पणजी/ विशेष प्रतिनिधी
यंदाच्या मौसम शनिवारी प्रथमच साखळी आणि वाळपाई केंद्रामधे सर्वाधिक पावसाची नोंद शनिवारी झाली. साखळी केंद्रामध्ये पाच इंच तर वाळपळीमध्ये चार इंच पावसाची नोंद झाली गेल्या 24 तासात सर्वत्र जोरदार पाऊस पडला व सरांसाठी अडीच इंच एवढी नोंद झाली यामुळे यंदाच्या मौसमतील पाऊस आता 54 इंच एवढा झाला आहे आज पासून पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता आहे.
राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला शुक्रवारी रात्रभर संपूर्ण गोवाभर पावसाची रीप रिप चालूच राहिली. साखळी येथे 130 मिलिमीटर वाळपई मध्ये चार इंच म्हापसा व सांगे येथे प्रत्येकी साडेतीन इंच, पेडणे फोंडा पणजी जुने गोवे येथे प्रत्येकी पावणेतीन इंच पावसाची नोंद झाली कानकोन येथे एक इंच तर मडगाव मध्ये अडीच इंच एवढा पाऊस झाला राज्यात वारकरी वगळता इतर सर्वत्र जोरदार पाऊस झाला. शनिवारी उत्तर गोव्यात दक्षिण गोव्याच्या तुलनेत चांगला पाऊस झाला उत्तर गोव्यात सरासरी साडेतीन इंच तर दक्षिण गोव्यात सरासरी दोन इंच पाऊस झाला त्यामुळे सरासरी अडीच इंच पावसाची नोंद संपूर्ण गोव्यात झाली मौसमत आतापर्यंत 52.50 इंच एवढा पाऊस नोंदविला आहे. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार काही भागांमध्ये आगामी 48 तासात मध्यम तथा जोरदार पाऊस पडू शकतो 12 तारीख नंतर मध्यम तथा हलक्या स्वरूपात पाऊस होईल.









