वृत्तसंस्था/ मेलबर्न
येथे सुरू असलेल्या 2022 च्या फिना विश्व जलतरण स्पर्धेत भारताची महिला जलतरणपटू चाहत अरोराने महिलांच्या 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला.
महिलांच्या 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये अरोराने 1 मिनिट 13.13 सेकंदाचा अवधी घेतला. अरोराने राष्ट्रीय विक्रम नोंदविला असला तरी तिला उपांत्य फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध करता आली नाही. पात्रता फेरीमध्ये एकूण या क्रीडा प्रकारात 55 स्पर्धकांचा समावेश होता आणि अरोराला 42 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत आता शनिवारी चाहत अरोरा महिलांच्या 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये भाग घेणार आहे. सदर स्पर्धा रविवारी संपणार आहे.









