जपानमध्ये लोकांकडून अनोखा प्रकार
चहा हे पेय जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आढळून येते. चहाचा इतिहास चीनशी जोडलेला असला तरीही भारतात तो इंग्रजांनी आणला. जगातील प्रत्येक देशात चहा तयार करणे आणि पिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. परंतु जपानमधील चा-नो-यू समारंभाबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का? चा-नो-यू प्रत्यक्षात जपानी संस्कृतीचा हिस्सा असून यात ग्रीन टी पिला जातो. सन 1500 च्या आसपास याची सुरुवात झाली आणि जपानच्या प्रत्येक घरात हा सोहळा होतो.
भारतात चहा घरासह कोपऱ्यावरील दुकानातही उपलब्ध होतो. चहा हे एकत्र बसून गप्पा मारण्याचे माध्यम देखील आहे. जपानमध्ये देखील काहीसे असेच घडते. परंतु ही अत्यंत सांस्कृतिक पद्धत आहे. जपानमध्ये लोक एका बंद खोलीत चहा पितात, तेथे जमिनीवर बसून तीन ते चार लोक एकत्र चहाचा आनंद घेतात, यादरम्यान कपात अत्यंत कमी प्रमाणात चहा ओतला जातो, जपानी लोक हा चहा अत्यंत सावकाश पित असतात आणि यात दोन-तीन तासांचा कालावधी लागतो.
का होतो समारंभ
जपानमध्ये चा-नो-यू समारंभ ज्या खोलीत आयोजित होता, त्याला चाशित्सू म्हटले जाते. चाशित्सुचे छत खाली असते, जेथे एकप्रकारचे मॅट ज्याला तातामी म्हटले जाते, तेथे अंथरलेले असते. चार ते पाच लोक यावर बसून चहा पितात. हा समारंभ लोकांनी एकत्र बसण्याचे माध्यम आहे.









