प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळय़ाची उभारणी करण्यात येत आहे. हिंदवी स्वराज्य युवक संघ व येळ्ळूर ग्रामस्थांच्यावतीने हा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्या पुतळय़ासाठी आता देणगीदार देणगी देण्यासाठी पुढे येत आहेत. दसरोत्सव काळात खंडेनवमी दिवशी पोवाडा कार्यक्रमाचे आयोजन या संघाच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी मूर्तीकार संजय किल्लेकर यांना शिवपुतळा तयार करण्यासाठी काही रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी अनेक देणगीदारांनी देणगीही जाहीर केली.
श्री चांगळेश्वरी मंदिरासमोर वैष्णवी मंगनाईक व ग्रुप आणि चंदगड तालुक्मयातील बसर्गे गावच्या मंडळाने पोवाडा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील होते. या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि ब्रम्हलिंग सोसायटीचे संचालक बाळासाहेब पावले यांनी पुतळय़ासाठी तब्बल 1 लाख रुपये जाहीर केले.
याचबरोबर अध्यक्ष सतीश पाटील यांनी 55 हजार 555 रुपये, उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर यांनी 51 हजार रुपये, महादेव बाळेकुंद्री यांनी 51 हजार रुपये, महेश सारावरी यांनी 25 हजार रुपये, सुधा आप्पाजी मेलगे यांनी 21 हजार रुपये, भुजंग पाटील यांनी 11 हजार रुपये, अशोक हट्टीकर यांनी 11 हजार रुपये, प्रशांत बेकवाडकर यांनी 7 हजार रुपये, संगम सेंटर यांनी 3 हजार रुपये अशा देणग्या जाहीर केल्या आहेत. या कार्यक्रमाला ओमकार पाटील, रमेश माणकोजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मजुकर, उपाध्यक्ष परशराम पाटील, सेपेटरी चांगदेव मुरकुटे, दिनकर घाडी, आकाश मंगनाईक, मारुती येळगुकर, उत्तम खनगावकर, राहुल कुगजी, विनोद फाकरे, रमेश परीट, मारुती शहापूरकर, शुभम पाटील, आनंद उडकेकर, मधु बेकवाडकर, जोतिबा पाटील, राहुल उडकेकर, नागराज धामणेकर, अनिल पाटील, सतीश पाटील आदी उपस्थित होते. आनंद पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.









