मागील लेखामध्ये अल्बर्ट गोन्झालेझ, गैरी मैकिनॉन, केविन मिटनिक, जोनाथन जेम्स ह्या हॅकर्सबद्दल माहिती पाहिली होती. आज आणखीन काही हॅकर्सची माहिती पाहूया ज्यांनी संगणक विश्व बदलून टाकले.
केविन ली पौल्सनचा जन्म 30 नोव्हेंबर 1965 साली पासाडेना, कॅलिफोर्निया येथे झाला. वयाच्या 17व्या वषी त्याने त्याचा ‘ऊRए-80 हा रंगीत संगणक’ वापरून यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सचे अर्पानेट हॅक केले, अर्पानेट हे इंटरनेटच्या आधीचे नेटवर्क होते. मात्र तो याच्या कारवाईतून सुटला. त्यानंतर पौल्सन याने एसआरआय आणि सन मायक्रोसिस्टम्स येथे कॉम्प्युटर प्रोग्रामर आणि पेंटागॉन सायबर सिक्मयुरिटी सल्लागार म्हणून काम केले. मात्र पुढे दुसरेच वाढून ठेवले होते. 1988 मध्ये, त्याच्या कंपनीच्या काही अधिकाऱयांना फेडरल इन्व्हेस्टीगेशन ऑफ फर्डिनांड मार्कोसचा डेटाबेस क्रॅक केल्याचा संशय आला व ते त्याच्या मागे लागले. जसे हे केविन पौल्सनला समजले तसा तो फरार झाला. त्याला फरारी म्हणून घोषीत केले. याच दरम्यान पौल्सनने फेडरल कॉम्प्युटर हॅक करून, तसेच परदेशी वाणिज्य दूतावास, संशयित मॉबस्टर्स आणि अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनचे तपशील उघड केले. त्याने एफबीआय प्रंट कंपन्यांचे तपशीलदेखील हॅक केला. अमेरिकेतील पोलीस, केविन पौल्सनला त्याला ‘सायबर क्राईमचा हॅनिबल लेक्टर’ असे म्हणत होते. हॅनिबल लेक्टर हे कादंबरीकार थॉमस हॅरिस यांनी तयार केलेले ‘सिरीयल किलर’चे काल्पनिक पात्र होते.
त्याच्या 17 महिन्यांच्या या कालावधीमध्ये, पौल्सन आणि दोन मित्र, रोनाल्ड ऑस्टिन आणि जस्टिन पीटरसन यांनी, रेडिओ स्टेशन ख्घ्घ्ए-इश् 102 वरुन फोनलाइन हॅक करून, ते 102 चे भाग्यवान विजेते आहेत असे भासवत दोन नवीन पोर्श, त्र्20,000 आणि दोन हवाई सुट्टय़ा जिंकल्या होत्या. एनबीसी (नॅशनल ब्रॉडकास्टींग कंपनी)च्या अनसॉल्व्ड मिस्ट्रीज नावाचा शो प्रदर्शित झाला तेव्हा शोच्या 1-800 टेलिफोन लाईन्स रहस्यमयरीत्या क्रॅश झाल्या. ही करामत पौल्सनने केली. मात्र एप्रिल 1991 मध्ये त्याला अटक करण्यात आली. जून 1994 मध्ये, पौल्सनने कट रचणे, फसवणूक करणे आणि वायरटॅपिंग (फोनलाईन हॅक)च्या सात विविध गुह्यांसाठी दोषी ठरवलं. त्याला फेडरल पेनटेन्शयिरीमध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. पौल्सनच्या सुटकेनंतर तीन वर्षांपर्यंत संगणक किंवा इंटरनेट वापरण्यास बंदीही घालण्यात आली. तुरुंगातून सुटलेला तो पहिला अमेरिकन कैदी ज्याने त्याच्या तुरुंगवासाच्या शिक्षेनंतर संगणक आणि इंटरनेट वापरण्यास बंदी घातली होती.
1995 मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर पौल्सनने आपला मार्ग बदलला. वाममार्ग सोडून चांगला मार्ग पत्करून त्यांनी पत्रकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नंतर वायर्डसाठी संपादक म्हणून काम केले. 2006 मध्ये, त्याने मायस्पेसवर 744 लैंगिक गुन्हेगारांना ओळखण्यात कायद्याची मदत केली. सध्या ‘द डेली बिस्ट’ साठी संपादक म्हणून काम करत आहे. जॉन लिटमन यांच्या ‘द वॉचमन ः द ट्विस्टेड लाइफ अँड क्राइम्स ऑफ सिरीयल हॅकर केविन पौल्सन’ या थ्रिलर चरित्रात पौल्सनच्या कारनाम्याचे तपशीलवार वर्णन आहे. रॉबर्ट टप्पन मॉरिस (जन्म 8 नोव्हेंबर 1965) हा एक अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ आणि उद्योजक आहे. त्याने 1988 मध्ये “मॉरिस वर्म’’ नावाचा इंटरनेटवरील पहिला संगणक वर्म तयार केला. हा “मॉरिस वर्म’’ सोडल्याबद्दल खटला भरण्यात आला आणि तो तत्कालीन नवीन “कॉम्प्युटर फ्रॉड अँड अब्युस ऍक्ट’’ (ण्इAA) अंतर्गत पहिला दोषी व्यक्ती ठरला. रॉबर्ट टप्पन मॉरिसने पॉल ग्रॅहम बरोबर “व्हायवेब’’ हे पहिले ऑनलाइन स्टोअर वेब ऍप्लिकेशन्स तयार केले आणि नंतर वाय कॉम्बीनेटर ही व्हेंचर कॅपिटल फंडिंग फर्मची पॉल ग्रॅहमबरोबर कंपनी तयार केली. रॉबर्ट टप्पन मॉरिस 2006 मध्ये मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाला. 2019 मध्ये त्यांची राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमीसाठी निवड झाली.
मात्र रॉबर्ट टप्पन मॉरिस हा “मॉरिस वर्म’’ साठी प्रसिध्द झाला होता. ह्या “मॉरिस वर्मने जगभर धुमाकूळ घातला होता. 2 नोव्हेंबर 1988 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील कॉम्प्युटरवरुन इंटरनेटवर एक मॅलिशिअस प्रोग्राम प्रसारित झाला. हा “मॉरिस वर्म’’ विलक्षण वेगाने कॉम्प्युटरमध्ये पसरत होता आणि कॉम्प्युटरचे काम ठप्प करत होता. कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथील एका संबंधित विद्यार्थ्याने “आमच्यावर सध्या हल्ला होत आहे,’’ असा ईमेल लिहिला होता. त्या रात्री साधारण 60,000 कॉम्प्युटरपैकी 6,000 कॉम्प्युटरवर ह्या “मॉरिस वर्म’’ने हल्ला करुन काम बंद पाडले होते. कॉम्प्युटर वर्म हा व्हायरसचा असा प्रकार आहे ज्याला कोणत्याही सॉफ्टवेअरची आवश्यकता नाही तर नेटवर्कमध्ये जोडले गेलेल्या कॉम्प्युटरद्वारे हा पसरला जातो. ह्या मॉरिस वर्मने अनेक प्रति÷ित महाविद्यालये, सार्वजनिक आणि खाजगी संशोधन संस्थांमधील प्रणालींना धोका उत्पन्न केला होता. संगणक किती महत्त्वाचे पण असुरक्षित-आहेत हे समजण्याची वेळ आली होती. हा देशावर पडलेला खूप मोठा प्रभाव होता असे अमेरिकेला लक्षात आले. सायबर सुरक्षिततेची कल्पना संगणक वापरकर्त्यांनी अधिक गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. हल्ल्याच्यानंतर, संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार देशाची पहिली “कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’’ पिट्सबर्गमध्ये स्थापन करण्यात आली. 30 वर्षांपूर्वीचा पहिला नेटवर्क हल्ला देशासाठी आणि येणाऱया सायबर युगासाठी एक वेक-अप कॉल होता. एड्रियन अल्फोन्सो लॅमो एटवुड ह्याचा जन्म 20 फेब्रुवारी 1981 साली माल्डन, मॅसॅच्युसेट्स अमेरिका येथे झाला. हा धमकी देणे आणि हॅकिंग करणे यासाठी ओळखला जातो. द न्यूयॉर्क टाइम्स, याहू आणि मायक्रोसॉफ्टसह अनेक हाय-प्रोफाइल कॉम्प्युटर नेटवर्क्स हॅक केल्याने प्रथम प्रकाशझोतामध्ये आला. ज्याचे स्वरुप 2003 मध्ये अटकेमध्ये झाले. -विनायक राजाध्यक्ष