मुंबई
टायर विश्वातील कंपनी सीएटच्या समभागाने पाच वर्षानंतर उच्चांकी पातळीवर पोहचण्यात यश मिळवले आहे. सीएटच्या समभागाने बुधवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 1 टक्का वाढत 1996 रुपयांचा स्तर प्राप्त केला होता. मे महिन्यात कंपनीचा समभाग जवळपास 42 टक्के इतका वाढला आहे. कंपनीने अलीकडेच आपला तिमाहीचा अहवाल सादर केला असून दमदार महसूल चौथ्या तिमाहीत प्राप्त केल्याची माहिती आहे. कंपनीने तिमाहीत 11,263 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केलाय.









