ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर (CET exam schedule announced) करण्यात आल्या आहेत. मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी नीट आणि जेईई परीक्षेच्या तारखांचा विचार करुन तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता वेळापत्रक जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 2022-23 साठी सीईटी परीक्षा 3 ते 10 जून महिन्यात होणार होत्या. मात्र, जेईई आणि नीट परीक्षांमुळे सीईटी परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहे. परीक्षांचे सुधारित वेळापत्रक http://mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.