पुणे \ ऑनलाईन टीम
अकरावी प्रवेशासाठी नियोजित सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) मुंबई उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे महानगरांमध्ये आता अकरावीची प्रवेश थेट नेहमीच्या केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी १६ ऑगस्टपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात होत आहे.
उच्च न्यायालयाने अकरावी प्रवेशासाठी २१ ऑगस्टला होणारी सीईटी परीक्षा रद्द केली आहे.अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेची कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CET) रद्द करण्याचा मोठा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. त्याचवेळी अकरावीचे प्रवेश हे दहावीच्या गुणावंरच आधारीत करण्यात यावेत अशाही सूचना हायकोर्टाकडून देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने केलेल्या सीईटी परीक्षेचा अध्यादेश रद्द करत हायकोर्टाने अत्यंत मोठा निर्णय दिल्याने २१ ऑक्टोबर रोजी होणारी सीईटी परीक्षा आता होणार नाही. आयसीएसई, सीबीएसई आणि एसएसई या तिन्ही बोर्डाच्या विद्यार्थ्यांची सीईटी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तसेच या निर्णयाला विरोध दर्शवल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानूसार अता अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पुण्यासह पिंपरी चिंचवड, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी गेल्या दहा वर्षांपासून ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने प्रक्रिया राबविण्यात येते. आता सीईटी रद्द झाल्याने थेट या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील अशी माहिती मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंझारराव यांनी दिली. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डी. जी. जगताप यांनी या आधीच पत्रकाद्वारे ही प्रक्रिया सुरू करत असल्याचे कळविले आहे. त्या पत्रकात ते म्हणातातत, ‘‘विद्यार्थी आणि पालिकांमधील संभ्रम, तसेच प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जागृतीचा अभाव असल्यामुळे प्रवेश प्रक्रिया राबविण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणून नोंदणी व अर्ज भरण्याची सुविधाच मुदतवाढ करत १६ ऑगस्टपासून सूरू करण्यात येत आहे.’’
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








