जुना पूल तोडण्याच्या कामासाठी 19, 20 नोव्हेंबरला ब्लॉक : गाड्या सुटण्याच्या व प्रवास संपण्याच्या स्थानकातही बदल
प्रतिनिधी/खेड
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद रेल्वे मार्गावरील जुना पूल तोडण्याचे काम 19 व 20 नोव्हेंबर रोजी हाती घेणार आहे. यासाठी मध्य रेल्वेकडून ‘ब्लॉक’ घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या या ब्लॉकचा सीएसएमटीकडे येणाऱया कोकण मार्गावरील 12 गाड्यांवर परिणाम होणार आहे. याशिवाय सलग दोन दिवस गाड्या सुटण्याच्या व पवास संपण्याच्या स्थानकातही बदल होणार आहे.
12052 कमांकाच्या मडगाव-मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्पेसचा 19 व 20 रोजीचा पवास दादर स्थानकातच संपणार आहे. 22120 कमांकाच्या मडगाव-मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्पेसचाही दादर स्थानकातच पवास संपेल. 19 नोव्हेंबर रोजी सुटणारी 10104 कमांकाच्या मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्पेसचा पवास पनवेल स्थानकात संपणार आहे. याचदिवशी सुटणारी 10112 कमांकाची मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्पेसही मडगावहून मुंबईला येताना पनवेल स्थानकापर्यंतच धावेल.
12134 कमांकाची मंगळूर-मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्सपेसचाही 19 नोव्हेंबरचा पवास पनवेल स्थानकातच संपेल. 20 नोव्हेंबर रोजी 10104 कमांकाची मडगाव-मुंबई सीएसएमटी मांडवी एक्स्पेस मुंबईच्या दिशेने येताना सीएसएमटीऐवजी पनवेल स्थानकातच विसावणार आहे. मध्य रेल्वेच्या या ब्लॉकमुळे मुंबईतून बाहेर जाणाऱया 5 गाड्या सुटण्याच्या ठिकाणांमध्येही बदल करण्यात आला आहे.
20 नोव्हेंबर रोजी सुटणारी मुंबई सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्पेस व 22119 कमांकाची मुंबई सीएसएमटी-मडगाव एक्स्पेस दादर स्थानकातून सुटेल. मुंबई सीएसएमटी-मडगाव दरम्यान धावणारी मांडवी एक्स्पेस पनवेल स्थानकातून सुटणार आहे. 12133 कमांकाची मुंबई सीएसएमटी-मंगळूर सुपरफास्ट एक्स्पेस पनवेल स्थानकातून सुटेल. मुंबई सीएसएमटी-मडगाव दरम्यान धावणारी कोकणकन्या एक्स्पेस 19 व 20 रोजी पनवेल स्थानकातून सुटणार असल्याचे रेल्वे पशासनाने स्पष्ट केले आहे.