पुण्यातील केंद्रात जाणे केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरत असल्याकडे वेधले लक्ष; सेवानिवृत्तांचेही हाल
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. या सर्वांना आरोग्यविषयक सुविधा, उपचार घेण्यासाठी पुण्यातील केंद्रीय आरोग्य केंद्रात जावे लागते. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, तसेच त्रासही होतो. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात केंद्रीय आरोग्य पेंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी शुक्रवारी राज्यसभेत केली.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार महाडिक जनतेच्या विविध प्रश्नांवर राज्यसभेतील कामकाजात मांडणी करत आहेत. शुक्रवारी त्यांनी नागरिकांच्या आरोग्य विषयक योजनांबाबत महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला. सार्वजनिक आरोग्य रक्षणासाठी केंद्र सरकारकडून जाणीवपूर्वक पावले उचलली जात आहेत. कोरोना काळात केंद्र सरकारचे कर्मचारी, निवृत्त कर्मचारी यांनाही आरोग्य विषयक अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पुणे येथे केंद्र सरकारचे आरोग्य केंद्र आहे. मात्र कोल्हापुरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना, पुण्यात जाऊन आरोग्य विषयक सुविधा घेणे शक्य होत नाही. त्यामुळे कोल्हापुरात केंद्र सरकारचे आरोग्य केंद्र सुरू होणे आवश्यक आहे. त्याचा उपयोग कोल्हापूर शहर आणि अकरा तालुक्यातील ग्रामीण भागातील सुमारे एक लाख पेक्षा अधिक कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांना होऊ शकेल. शिवाय सैन्यातील जवान, माजी सैनिक यांच्या आरोग्यासाठी केंद्रीय आरोग्य केंद्र महत्वाचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर कोल्हापुरात सेंट्रल गर्व्हमेंट हेल्थ स्किम (म्gप्s) अंतर्गंत केंद्रीय आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी खासदार महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना केली. त्याला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.









