बेळगाव प्रतिनिधी : केंद्र सरकार राज्यामध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत निजद तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. स्थानिक कन्नड भाषेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे, मात्र केंद्र सरकारने हिंदी भाषा राज्यामध्ये सक्तीची करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हे अत्यंत चुकीचे आहे तेव्हा त्याला आमचा विरोध आहे. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत अशी शक्ती करू नये, ही मागणी निवेदनात करण्यात आली, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुरगुंडी यांना निवेदन देण्यात आले आहे. बेळगाव जिल्हा अध्यक्ष शंकर माडलगी, प्रमोद पाटील, अशोक पाटील, शिवानंद संजीवगोळ,पी. एन. पठाण, मुर्गेश हिरेमठ, यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









