दोडामार्ग – वार्ताहर
Central Government Pensioners Association Dodamarg taluka meeting on 7th April
केंद्र सरकारच्या विविध खात्यातून निवृत्त कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे करण्यात आले आवाहन
सेंट्रल गव्हर्नरमेंट पेन्शनर्स असोसिएशनचा दोडामार्ग तालुक्याचा वार्षिक मेळावा रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वा. दोडामार्ग हायस्कूल येथे संपन्न होणार आहे. या मेळाव्याला असोसिएशनचे संस्थापक व माजी सचिव एम. डी. जोशी, जिल्हाध्यक्ष श्री. डिसोझा, जिल्हा संघटनमंत्री अॅड नकुल पार्सेकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र सरकारच्या विविध खात्यातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याबाबत केंद्र सरकारचे भविष्यकालीन धोरण, गेल्या वर्षभरात फॅमिली पेन्शन, काही नव्याने आलेले आदेश याबाबत माहिती दिली जाणार आहे. तरी दोडामार्ग तालुक्यातील केंद्र सरकारच्या ज्या विविध खात्यातून जे कर्मचारी निवृत्त झाले आहेत त्यांनी या मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.









