ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्रीय कर्मचाऱयांचे वर्क फ्रॉम होम आता बंद होणार आहे. कोरोनाकाळात सुरू झालेली बहुतांश लोकांना घरून काम करण्याची संधी सरकारने दिली होती. मात्र, आता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी फिजिकली कार्यालयात उपस्थित राहणे गरजेचे आहे. वर्क फ्रॉम होमची सुविधा आता सर्वसाधारणपणे लागू होऊ दिली जाणार नाही, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले.
लोकसभेत खा. रंजनबेन धनंजय भट्ट आणि श्रीनिवास पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जितेंद्र सिंह म्हणाले, कोरोना काळात कार्यालयात सामाजिक अंतराची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने काही सरकारी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी दिली होती. मात्र, कोरोना जवळपास नाहीसा झाला आहे. सर्व निर्बंध हटवले गेले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांचे कामाचे स्वरूप आणि त्याच्या कार्यात्मक गरजा लक्षात घेता बहुतांश भूमिकांसाठी ऑनलाईन काम करणे शक्य नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देणे आता शक्य नाही. त्यांनी कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे.
अधिक वाचा : राज्यात आणखी दोन दिवस ‘यलो अलर्ट’