ऑपरेशन सिंदूर नंतर मालवणात जल्लोष ; फटाक्यांची आतिषबाजी
मालवण | प्रतिनिधी : याचना नही अब रण होगा… संघर्ष बडा भीषण होगा… येतो पहिली झांकी है पीओके लेना बाकी है… यांसह ‘भारत माता की जय’ घोषणानी मालवण शहर परिसर दणाणला.भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान मधील दहशतवादी तळ उध्वस्त केले. शेकडो दहशतवादी ठार केले. पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. याबद्दल भारतीय वायू सेना व भारत सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवत मालवणात जल्लोष करण्यात आला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू जनजागृती समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने मालवण भरड नाका येथे फटाके फोडून व जोरदार घोषणा देत परिसर दणाणुन सोडला. या आनंदात नागरिकही सहभागी झाले.
फोटो : भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंदूर नंतर मालवणात जल्लोष करण्यात आला. (अमित खोत, मालवण)









