सावंतवाडी प्रतिनिधी
कृष्णजन्माष्टमीची एकीकडे धूम सुरू असताना माठेवाडा अंगणवाडीतील चिमुकल्यांनी आज गोविंदा आला रे आला च्या तालावर दहिहंडी उत्सवाचा आनंद घेतला.माठेवाडा येथील जि.प शाळा नं २ मधील अंगणवाडीतील तीन वर्षीय चैतन्या मेस्त्री विष्णू कावले, शौर्य नीरतवडेकर , रुद्र केनवडेकर , शुभम करमळकर, गुरुराज केसरकर या चिमुकल्यांनी गोविंदा पथक केले तर कृष्णाच्या वेषात कु.गंधार नाईक व समर्थ काष्टे यांनी तर राधेच्या वेषात कु. जिजा चव्हाण,भार्गवी मुंज,विशाखा साटिलकर,तनया शिरसाट रिद्धीमा किटलेकर, शिवन्या गवळी,स्निग्धा प्रभू,गार्गी गवळी, राधा मेस्त्री यांनी दहीहंडीत सहभाग घेतला.
यावेळी मुख्याध्यापिका चैताली गवस, प्रशालेचे शिक्षक,अंगणवाडी सेविका सौ अनुराधा पवार, मदतनीस अमिषा सासोलकर पालक महिला मृणाली चव्हाण, गौतमी गवळी,श्रेया गावडे,वनिता करमळकर, रूबिया डिसोजा, हर्षिता काष्टे आदी उपस्थित होते.









