राधानगरी / महेश तिरवडे :
कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्किट बेंचचा प्रश्न तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित होता. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी समाजातील विविध स्तरातील नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्याने व प्रयत्नांमुळे अखेर हा प्रश्न मार्गी लागला असून, जिल्ह्यातील जनतेला यामुळे मोठा दिलासा व न्याय मिळाला आहे.
या ऐतिहासिक यशाच्या निमित्ताने राधानगरी येथे नामदार प्रेमी गटाच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी ११ वाजता आमदार कार्यालयाजवळ पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आणि नामदार आबिटकर यांचे आभार मानले.
यावेळी कार्यकर्त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की, भविष्यातही नामदार आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या हिताचे अनेक निर्णय आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील.
या आनंदोत्सव प्रसंगी तानाजी चौगले, दीपक शेट्टी, सुहास निंबाळकर, राम कदम, संजय (भैय्या) पाटील, विजय आरडे, हसन राऊत, किरण पारकर, महेश अडसूळ, श्रेयस शेंडे, सचिन पालकर, मंगेश चौगले, संतोष तायशेटे यांच्यासह राधानगरीतील वकील, व्यापारी व नामदार प्रेमी गटाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








