कट्टा / वार्ताहर
लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी लि.शाखा कसाल यांच्यावतीने दि.२१/६/२०२३ रोजी ‘जागतीक योगा दिन’ च्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय कसाल येथे मुलांसाठी ‘योग कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमास जागतिक मल्लखांब स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त विजेती अर्जुन पुरस्कार प्राप्त कु.हिमानी परब उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे योगकार्यशाळेत सौ.उमा परब यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास ग्रा.पं.कसाल सरपंच श्री.राजन परब, ग्रामसेवीका कु.गुरखे, सदस्या पुनम शिर्के, पुजा आंबेरकर तसेच मुख्याध्यापक श्री.चव्हाण, केंद्रप्रमुख व प्राथमिक शिक्षक उपस्थित होते. योगकार्यशाळेत लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी कसाल शाखेच्या उपशाखा व्यवस्थापक सौ.समिधा वायंगणकर यांनी मार्गदर्शन करुन नियोजन बद्ध कार्यक्रम पार पडल्याने आभार व्यक्त केले. या कार्यक्रमावेळी उपस्थितांकडून ५० एवढा डाटा प्राप्त झाला.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









