बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या जितोतर्फे बसवण कुडची येथील नागनूर शिवबसव ट्रस्टच्या चिन्नम्मा बसवंतया हिरेमठ वृद्धाश्रमात वृद्धांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी बोलताना जितो चेअरमन वीरधवल उपाध्ये म्हणाले, आपण सर्वजण आपल्या घरातील ज्येष्ठांसोबत दिवाळी साजरी करतो. समाजातील सर्व घटक दिवाळी सण साजरा करतात. पण आश्रमातील ज्येष्ठांसोबत दिवाळी साजरी करण्याच्या इच्छेने आम्ही तुमच्यासोबत दिवाळी साजरी करत आहोत. ते सर्व आपल्या वडीलधाऱ्यांच्या बरोबरीचे आहेत. आम्हीही तुमच्या घरची मुले आहोत आणि दिवाळी सण आमच्यासोबत साजरा करा, असे ते म्हणाले. यावेळी आश्रमातील ज्येष्ठांना मिठाईचे वाटप करण्यात आले. याशिवाय आश्रमासाठी 1500 लिटर क्षमतेची पाण्याची टाकीही देण्यात आली. जितो संघटनेचे सचिव संजीव दो•न्नवर, सदस्य कुंतीनाथ कलमनी, कार्यक्रम समन्वयक सुनिल बस्तवड युवा संघाच्या अध्यक्षा दिपक सुभेदार, प्रनाथ पाटील आदी उपस्थित होते.
Previous Articleसीमाभाग शिवसेनेतर्फे बाळासाहेबांना आदरांजली
Next Article वैद्यकीय क्षेत्रातील स्टार्टअपना उभारी देणार!
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









