प्रतिनिधी/ बेळगाव
बालदिनाचे औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्यावतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. कणबर्गीजवळ झोपडपट्टी वस्तीमध्ये जाऊन लहान मुलांसोबत एंजल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मीनाताई बेनके यांनी केक कापून बालदिन साजरा केला.
तसेच झोपडपट्टीतील मुलांना बिस्कीट व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षा मीनाताई बेनके, फाउंडेशनचे सदस्य व रहिवासी उपस्थित होते.









