ग्रा. पं. ने कार्यक्षेत्रातील सर्व गावांत बसविले सीसीटीव्ही कॅमेरे; मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
वार्ताहर /जांबोटी
परिसरातील वाढत्या चोरीच्या घटना तसेच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जांबोटी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व गावांमध्ये ग्रामपंचायतीने स्वखर्चाने सीसीटीव्ही पॅमेरे बसविले असून ग्रामपंचायतच्या या उपक्रमाचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. नुकताच त्याचा लोकार्पण कार्यक्रम विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.
जांबोटी हे खानापूर तालुक्मयाच्या पश्चिम भागातील व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. तसेच महसूल विभागाचे मुख्य केंद्र असल्यामुळे या गावाशी सुमारे 40 ते 50 खेड्यांतील नागरिकांचा शासकीय कामकाज, बँक। बाजारहाट, शिक्षण तसेच अन्य कामकाजासाठी रोज संपर्क असतो. त्यामुळे नागरिकांची या ठिकाणी मोठी वर्दळ असत.s तसेच या ठिकाणाहून बेळगाव-चोर्ला-गोवा राज्य महामार्ग गेला असल्यामुळे पर्यटकांसह विविध राज्यातील नागरिकांचीही वर्दळ असते. शिवाय हा भाग जंगलमय प्रदेशाने व्यापला असल्यामुळे घरफोड्या, खून, दरोडे, चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांनी देखील अलीकडच्या काही वर्षात आपला मोर्चा या भागाकडे वळविल्यामुळे चोऱ्या तसेच गैरप्रकारांना दिवसेंदिवस ऊत आल्यामुळे जांबोटी बसस्थानक व इतर ठिकाणी सीसीटीव्ही पॅमेऱ्याची गरज होती.
पोलीस खात्यानेही ग्राम पंचायतीला तशी लेखी विनंती केली होती. वरील सर्व गोष्टींचा विचार करून जांबोटी ग्रामपंचायतने बसस्थानक व फॉरेस्ट नाका येथे फिरता सीसीटीव्ही पॅमेरा व राजवाडा, ओलमणी, वडगाव, चापोली आदी गावांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तसेच या सीसीटीव्ही यंत्रणेचे नियंत्रण पूर्णपणे जांबोटी पोलीस, आऊट पोस्टच्या अखत्यारीत देण्यात आल्यामुळे या गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्मयता आहे. ग्राम पंचायतच्यावतीने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचा औपचारिक लोकार्पण नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते सीसीटीव्ही यंत्रणेचे पूजन करून त्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्षा लक्ष्मी तळवार, उपाध्यक्ष सुनील देसाई, पिडीओ प्रकाश कुडची, ग्रा. पं. सदस्य अशोक सुतार, प्रविणा साबळे, मयुरी सुतार, लक्ष्मी मादार, अंजना हणबरसह पंचकमिटी व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.









