हनुमान चषक 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा : वेदांत पाटील सामनावीर
प्रतिनिधी /बेळगाव
आनंद क्रिकेट अकादमी आयोजित हनुमान चषक 12 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत सीसीआय संघाने आनंद अकादमीचा 7 गडय़ांनी, आनंद अकादमी अ ने धारवाड संघाचा 48 धावांनी, सीसीआय संघाने निना संघाचा, सीसीआय अ संघाने एसीए ब संघाचा 9 गडय़ांनी तर एसीए ब संघाने निना स्पोर्ट्स संघाचा 4 गडय़ानी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. वेदांत पाटीलला (सीसीआय) सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
भगवान महावीर जैन स्कूल भुतरामहट्टी येथील मैदानात प्रमुख पाहुणे अनिल सांगावकर, विजय देवणे, सतीश पाटील, राजू वेताळ, सुनील पेटोल, सुधीर बुडवली, आनंद करडी, प्रशांत लायंदर, प्रमोद जपे, ईश्वर इटगी, श्रेयस काळसेकर, तुषार चौगुले आदी मान्यवरांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
आनंद क्रिकेट अकादमी अ संघाने 20 षटकात 6 बाद 85 धावा केल्या. स्वराज जुवेकरने 13, अमर पाटणकरने 12 धावा केल्या. सीसीआयतर्फे खंडू पाटीलने 14 धावात 3 व स्वयम खोतने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळाताना सीसीआय संघाने 16 षटकात 3 बाद 88 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. वेदांत बिररालने 42, कैलास बेनिकट्टीने 16 धावा केल्या. आनंद अकादमीतर्फे श्लोक चडीचाळ व अवधूत चव्हाण यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात आनंद अकादमी अ संघाने 20 षटकात 2 बाद 107 धावा केल्या. त्याला उत्तर देताना धारवाड संघाचा डाव 59 धावात आटोपला. तिसऱया सामन्यात सीसीआय संघाने 20 षटकात 2 बाद 163 धावा केल्या. त्याला उत्तर देताना निना संघाने 20 षटकात 7 बाद 113 धावा जमविल्या.
चौथ्या सामन्यात आनंद अकादमी ब संघाने 20 षटकात 7 बाद 105 धावा केल्या. त्याला उत्तर देताना सीसीआय संघाने 15 षटकात 1 बाद 107 धावा करून सामना 9 गडय़ांनी जिंकला.









