विधानपरिषदेत मंत्री बंगारप्पा यांची माहिती
बेळगाव : सध्या राज्याच्या अभ्यासक्रमात 6 वी ते 10 वीपर्यंतच्या गणित आणि विज्ञान विषयांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण-साक्षरता मंत्री एस. मधु बंगारप्पा यांनी सांगितले. आमदार एम. एल. अनिलकुमार यांनी सोमवार दि. 16 रोजी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री बंगारप्पा बोलत होते. आरटीई (शिक्षण हक्क कायदा) जारी करण्यात आल्यानंतर पहिली ते आठवीपर्यंत प्रवेश शुल्क सरकारच भरणा करीत आहे. आठवीपासून पीयूसी द्वितीय वर्षापर्यंत कायदा जारी केल्यास ग्रामीण व शहरी भागातील गरीब विद्यार्थ्यांना सोयीचे होईल. सरकारने या योजनेचा विस्तार करण्याचा विचार केला आहे का? असा प्रश्न आमदार अनिलकुमार यांनी उपस्थित केला. यावर शिक्षणमंत्री बंगारप्पा यांनी या योजनेचा विस्तार करण्यासंबंधी प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे सांगितले.









