18 संघांचा समावेश : गुरुवारी बाद फेरीच्या लढती
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
गुडशेफर्ड सेंट्रल स्कूल आयोजित सीबीएससी वेणुग्राम -सहोदया आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला बुधवार दि. 19 रोजी प्रारंभ होणार आहे.
गुडशेफर्ड मैदानावर आयोजित या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत एकूण 18 संघांनी भाग घेतला आहे. त्यामध्ये सेंट तेरेसा, गुडशेफर्ड, केएलई, अंगडी, केएलई लिंगराज, कॅन्टोन्मेंट, शंकरलिंग, केएलई गोकाक, फॉर्ब्स गोकाक, ज्योती, जोशी, भरतेश, केएलई निपाणी, पोतदार, अमृता विद्यालय, लव्हडेल, शेख व केएलएस बेळगाव या संघांचा समावेश आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन गुडशेफर्ड स्कूलच्या क्हा. चेअरमन आशा घाटगे, प्राचार्या के. सरला, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, स्पर्धा सचिव इमरान बेपारी, रंजना सडेकर व निलेश आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाचा सामना गुडशेफर्ड वि. केएलई इंटरनॅशनल या दोन संघात सकाळी 8 वा. होणार आहे. दुसरा सामना लव्हडेल वि. शेख सेंट्रल यांच्यात सकाळी 9 वा., तिसरा सामान अंगडी वि. केएलई लिंगराज सकाळी 10, चौथा सामना ज्योती वि. जोशी यांच्यात 11 वा., पाचवा सामना कॅन्टोन्मेंट वि. शंकरलिंग यांच्यात 12 वाजता, सहावा सामना भरतेश वि. केएलई निपाणी यांच्यात 1 वा., सातवा सामना केएलई गोकाक वि. फॉर्ब्स गोकाक यांच्यात होणार
आहेत.
पहिल्या दिवशी 10 सामने खेळविण्यात येणार असून, गुरूवारी उपांत्यपूर्व, उपांत्य व अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे.









