प्रतिबंधात्मक आदेश जारी
प्रतिनिधी/ बेळगाव
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) नवी दिल्लीतर्फे दहावी, बारावीच्या परीक्षा दि. 15 फेब्रुवारी ते 4 एप्रिलपर्यंत होणार आहेत. जिल्ह्यात विविध शाळा-विद्यालयांत परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. परीक्षा सुरळीतपणे होण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रतिबंधात्मक आदेश बजावला आहे.
परीक्षा केंद्रांच्या 200 मीटर परिसरात पाच किंवा पाचहून अधिक लोकांनी एकत्र येणे, सार्वजनिक सभा, मिरवणूक काढणे यावर निर्बंध असेल. शस्त्र, स्फोटक वस्तू घेऊन फिरणे, फटाके फोडणे याला निर्बंध असेल. परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने, इंटरनेट केंद्रे परीक्षा काळात बंद ठेवावीत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रोशन यांनी आदेशात म्हटले आहे.









