नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE बोर्ड इयत्ता १२ वीचा निकाल आज दुपारी २ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. CBSE बोर्डाची १२ वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in या सीबीएसईच्या अधिकृत वेवसाईटवर आपला निकाल जाणून घेता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, CBSE बोर्ड इयत्ता १२ वी परीक्षा २०२१ साठी साधारण १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोरोना महामारीमुळे CBSE ने १२ वीची परीक्षा रद्द केली होती मात्र या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. CBSE बोर्डाचा १२ वीचा निकाल आज जाहीर होणार असून १०वीच्या परीक्षेचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता आहे. मात्र बोर्डने अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








