वृत्तसंस्था/गांधीनगर
2005 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी संतोष कर्नानी यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने गुरुवारी गुजरात आणि राजस्थानमधील 11 ठिकाणी छापे टाकले. गांधीनगर, अहमदाबाद आणि जयपूर येथील कर्नानी कुटुंबीय, त्यांचे जवळचे सहकारी आणि कुटुंबातील सदस्यांशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. कर्नानी हे यापूर्वी अहमदाबादमध्ये अतिरिक्त प्राप्तिकर आयुक्त म्हणून कार्यरत होते. एका बांधकाम व्यावसायिकाकडून लाच मागितल्याच्या आरोपाखाली त्यांची चौकशी सुरू होती. त्यांनी जाणूनबुजून बेकायदेशीर संपत्ती जमवली आणि त्यांची पत्नी आरती कर्नानीनेही त्याला 1.31 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची बेनामी मालमत्ता जमवण्यास मदत केल्याचा आरोप आहे.









