कोल्हापूर / संतोष पाटील :
व्हॉटस्अप, फेसबुकवर रोज अपलोड होणारे डिपी व प्रोफाईल पिक्चरसह तासन्तास होण्राया चॅटींगची नेटिझन्स्ना सुरक्षित वाटत असेल तर ते अज्ञान आहे. डिपीचे फोटो व डेटावर आंतराष्ट्रीय हॅकर्सचा सतत डोळा असतो, हे विसरुन चालणार नाही. हॅकर्सकडून फोटो व डेटाची ऑनलाईन बाजारात विक्री होत असल्याचे सायबर फॉरेन्सिक तज्ञांकडू वारंवार सांगण्यात येते. याउलट सायबर सुरक्षेबाबत तरुणाई अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. डीपी व डेटाचा इतरत्र वापर झाल्यास मानसिक व सामाजिक खच्चिकरण होण्यापूर्वी सावधानता बाळगण्याची गरज आहे.
सध्या 80 टक्के लोकांकडे स्मार्ट मोबाईल फोन आहेत. स्मार्ट फोनच्या माध्यमातून इंटरनेटशी कनेक्टेड आहेत. एकट्या कोल्हापूरचाच विचार केला रोज सरासरी 20 लाख लोक नेटच्या महाजालाशी जोडलेले असतात. फेसबुक व व्हॉटसअप, एक्स, इन्स्टा, इतर रिल्स अॅप हे तर नेटीझन्सच्या गळ्यातील ताईतच आहेत. यामाध्यमातून गप्पांसोबत सोशल साइटवर छायाचित्र अपलोड करत कम्युनिटी व लाइक वाढविण्याची स्पर्धादेखील पहावयास मिळते. वैयक्तिक माहिती ज्ञात व अज्ञातांसोबत शेअर करताना सायरबर सुरक्षेचे अजिबात भान राखले जात नाही. फेसबुक व व्हॉटस्अपचा वापर करताना वैयक्तिक सुरक्षेची तजवीज या कंपन्यांनी केली आहे. मात्र अज्ञानामुळे तशी सुरक्षा अॅक्टिवेट करण्याची खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे नको त्या ठिकाणी व नको त्या संकेतस्थळावर तुमच्या छायाचित्रांमध्ये आक्षेपार्ह बदल करुन त्याचा अवैध वापर केला जावू शकतो, असे मत संगणक तज्ञ्ज प्रणव आवळेकर यांनी सांगितले.
- ही खबरदारी घ्या..
1) सोशल साईटवरील शेअरिंगमध्ये हॅकर्सचा हस्तक्षेप टाळण्यासाठी सेटीग्ज्मध्ये अकाउंट पर्याय निवडून त्यामधील सिक्युर पर्याय क्लिक करुन सिक्युरिटी अॅक्सेस सुरू करा. त्यामुळे हॅकर्स आपल्या लघुसंदेशात बदल करू शकणार नाही व संभाषण अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल.
2) ई–मेल अकाउंट वापारतात अकाउंट पर्यायामध्ये सिक्युरिटी सेटिग्ज निवडून सेकंड स्टेप्स् ऑथिंटकेशन चालू करावे व वापरात असलेला मोबाईल क्रमांक अचून नोंदवावा. जेणेकरून तुमचा ई–मेल दुसऱ्या कोणी लॉग ऑन करण्याचा प्रयत्न केल्याची याची आपल्या मोबाईलवर तात्काळ माहिती येईल.
3) अनोळखी व्यक्तीसोबत फेसबुक किंवा वॉटस्?पवर कसलेली शेअरिंग करु नये.
4) इंटरनेटच्या माध्यमातून अपलोड केलेली कोणत्याही स्वरुपाची माहिती (फोटो, व्हिडीओ, शाब्दिक) ही व्हायरल होवू शकते. त्यामुळे गरज तपासूनच अपलोडींग करावे.
5) डीपी व प्रोफाईलवर शक्य झाल्यास स्वत: किंवा कुटुंबातील व्यक्तीचा फोटो ठेवू नये. ठेवल्यास छायाचित्र कमी पिक्सलचे असावे, जेणेकरुन या छायाचित्राचा गैरवापर होणार नाही.
6) फेसबुकवर प्रोफाईल ठेवताना ओन्ली मी चा पर्याय निवडा. व्हॉटस्?पचा डीपी ठेवताना ओन्ली माय कॉन्टॅक्टस्चा पर्याय निवडावा. त्यापेक्षा नोबडी चा पर्याय निवडल्यास अधिक सुरक्षित ठरेल.








