कातउत्पादकांच्या समस्या सोडविण्याबाबत दिले लेखी निवेदन
सावंतवाडी : प्रतिनिधी
कातउत्पादकांच्या समस्या तातडीने सोडविण्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे रत्नदुर्ग कात उत्पादक संघातर्फे लक्ष वेधण्यात आले .यासंदर्भात लेखी निवेदन देण्यात आले. कोकणातील कात उद्योजक गेली अनेक वर्षे पारंपारिक व्यवसाय करीत असून ग्रामीण अर्थकारणाला हातभार लावणारा कात उत्पादन हा एक व्यवसाय आहे.
या व्यवसायातील उद्योजकांना समस्या भेडसावत असून वर्षातून काही ठराविक काळ चालणारा हा व्यवसाय कायद्याच्या जाचक तरतूदीमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. उद्योगाला येणाऱ्या जाचक अटी शिथील करून कातउद्योगाला संजीवनी द्यावी. ती मागणी करण्यात आलीराज्यस्तरीय समिती (SLC) मधून कातउद्योगास वगळण्यात यावे.केंद्र सरकारच्या धोरणानुसार खैर हा शाश्वत शेती अभियानामध्ये समाविष्ठ करण्यात आलेला आहे. त्यामुळे खैरापासून उत्पादीत होणा-या मालाला SLC च्या परवानगीची आवश्यकता नाही. असे आमचे मत आहे. तसेच राज्य सरकारने २०१८ साली खैर प्रजातीला वनशेतीमध्ये समाविष्ठ केले आहे . अधिकृत साठा केलेले “खैर” लाकूड SLC चे परमीट मिळाल्याशिवाय कात उत्पादनासाठी वापरता येत नाही. या परिस्थित अनेक आर्थिक समस्या निर्माण होतात.
खैरापासून उत्पादीत केलेला कात हा जीएसटी बिलाद्वारे विक्री केला जातो. त्यासाठी केंद्रसरकारच्या पोर्टलवरून ई- बील तयार करून त्याची वाहतूक केली जाते. सबब उत्पादीत कात मालाला वनखात्याच्या वहातूक पासाची अट शिथील करून केंद्राच्या ई-वे बील प्रणालीला वनखात्यानेही मान्यता द्यावी. केंद्राने काताला HSN Code दिला असून माल विक्रेता, खरेदीदार, वाहन, उत्पादीत माल यांची स्वयंस्पष्ट माहिती सरकारला ई-वे बीलाद्वारे मिळते. हे ई वे बिल व माल विक्री बिल वहातूकीचे वेळी गाडीसोबत ठेवले जाते. निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी रत्नदुर्ग कागदपत्र संघाचे अध्यक्ष बाळा जाधव ,सचिव मजीत पन्हाळेकर, सुधाकर चांदोरकर ,उपाध्यक्ष सदस्य जितेंद्र गावकर, विलास शेट्टी, संदेश धुमाळे, केतन जाधव, चैतन्य चांदोरकर उपस्थित होते.









