कोरोनामुळे जगभरातले लोक जागरूक होऊ लागले आहेत. घातक रसायनं, प्राणीजन्य घटकांच्या वापरामुळे होणार्या दुष्परिणामांची जाणीव होऊ लागल्यामुळे रसायनयुक्त सौंदर्यप्रसाधनांऐवजी वेगन तसंच ऑरगॅनिक म्हणजेच पूर्णपणे नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार करण्यात आलेली उत्पादनं वापरण्यावर भर दिला जात आहे. सौंदर्यप्रसाधनांच्या जगात हा नवा बदल अनुभवायला मिळत आहे. वेगन तसंच सात्विक आहाराला महत्त्व देणार्यांना आता वेगन सौंदर्यप्रसाधनं हवी आहेत. आपल्या मेक अप किटमध्ये नैसर्गिक घटकांनी युक्त सौंदर्यप्रसाधनं असावीत, असं अनेकींना वाटू लागलं आहे. महिलांच्या या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन बहुराष्ट्रिय कंपन्यांनीही अशी उत्पादनं बाजारात उतरवायला सुरूवात केली आहे. मान्सून काळात त्वचेची जास्तच काळजी घ्यावी लागते. वेगन तसंच ऑरगॅनिक सौंदर्यप्रसाधनांमधली जीवनसत्त्वं तसंच खनिजं त्वचेमध्ये अगदी सहज शोषली जातात आणि त्वचेला आवश्यक पोषण मिळतं. बॅक्टेरियाविरोधी तसंच अँटी एजिंग गुणधर्मांमुळे ही उत्पादनं महिलावर्गाच्या विशेष पसंतीस उतरत आहेत.
Browsing: अस्मिता
अस्मिता
कोरोनाकाळात उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. अनेकांचे पगार वेळेवर होत नाहीत. नोकर्याही संकटात आहेत. अशा वेळी आवश्यक तेवढी आणि विचारपूर्वक खरेदी…
काही महिन्यांपूर्वीपर्यंत सेल्फी हा परवलीचा शब्द होता. मात्र कोरोनाच्या प्रकोपानंतर सोशल मीडियावर मास्कीची चलती आहे. ‘मास्की’ म्हणजे मास्क घातलेले फोटो…
अंतरा मेहताच्या रुपात भारताला दहावी तर महाराष्ट्राला पहिली महिला लढाऊ वैमानिक मिळाली आहे. अंतराने अगदी लहान वयापासूनच भारतीय सैन्य दलात…
प्रत्येकाच्या घरात पैसा ठेवायची एक निश्चित जागा असते. जास्तकरून लोक आपल्या पैशांना सुरक्षित ठेवण्यासाठी कपाट किंवा तिजोरीचा वापर करतात. बऱयाच…
ज्याची त्वचा कोरडी असते त्यांना त्वचेची काळजी घेण्यात खूपच समस्या येतात. कारण कोणतेही क्रीम किंवा मॉईश्चराईजर जास्त काळाकरिता त्यांच्या त्वचेवर…
मैत्रिणींनो, लालचुटुक टोमॅटो पदार्थांची, भाजीची चव वाढवतात. टोमॅटोच्या पिकावर घातक किटकनाशकांची फवारणी होते. त्यामुळे हे टोमॅटो वापरण्याआधी स्वच्छ धुवावे लागतात.…
मैत्रिणींनो, सध्याच्या काळात गरोदरपण साजरं केलं जातं. विविध क्षेत्रातल्या सेलिब्रिटीज हा काळ एंजॉय करताना दिसतात. गरोदरपण हे ओझं न मानता…
विविध क्लिंजर्स, मेक अप उत्पादनांमध्ये घातक रसायनं असतात. या रसायनांमुळे त्वचेचं नुकसान होतं. हे टाळण्यासाठी तुम्ही घरी उपलब्ध असणार्या नैसर्गिक…
मी 28 वर्षांची तरुणी असून माझी एकही जिवलग मैत्रीण नाही. मी मित्रमैत्रिणींसोबतचं नातं टिकवून ठेऊ शकत नसल्यामुळे ते मला सोडून…












