कुपवाड / प्रतिनिधी
Sangli Crime news : कुपवाड शहरात खवल्या मांजरांच्या खवल्यांची तस्करी होत असल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याबाबत माहिती मिळताच सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी खवले विक्री करण्यास आलेल्या रत्नागिरीच्या दोघांना रंगेहाथ पकडून अटक केली आहे.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील ४ किलो ७५० ग्रॅम वजनाची अंदाजे ११ लाख ८७ हजार ७०० रूपये किंमतीची खवले हस्तगत केली आहेत. यामध्ये संशयित इम्रान अहमद मुलाणी (वय ४२, रा.अलोरे ता.चिपळूण जि.रत्नागिरी ) व दिनेश गोपाळ डिंगणकर (वय ४५,रा.चिंद्रवळे ता.गुहागर जि.रत्नागिरी) अशी अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत. कुपवाड ते माधवनगर रस्त्यावर अहिल्यानगर (शिवमुद्रा चौकात) मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








